Aarti Sangrah in Marathi | आरती संग्रह (संपूर्ण)

Ganpati-bappa-morya_02

Aarti Sangrah in Marathi | आरती संग्रह (संपूर्ण) MARATHI AARTI SANGRAH contains all main Marathi aarti’s (hindu religious choirs) which are sung in front of Lord Ganesh during Ganesh Festival. सुंदर मराठी आरती संग्रह , या मधे सुंदर आरत्या दिलेल्या आहेत, हा सर्वात मोठा मराठी आरती संग्रह आहे.

श्री गणप‍‍तीची आर‍‍ती

सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची।

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।

कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।।1।।

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।धृ।।

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।

चंदनाची उटी कुंकुमकेशरा

हिरे जडित मुकुट शोभतो बरा

रूणझुणती नुपुरे चरणी घागरिया ।।२ ।।

लंबोदर पीतांबर फ‍ण‍ीवरवंदना ।

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।

दास रामाचा वाट पाहे सदना ।

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।

शेंदूर लाल चढायो आर‍‍ती

शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको,

दोंदिल लाल बिराजे सूत गौरीहरको ,

हाथ लिए गुड-लड्डू साईं सुरवरको ,

महिमा कहे ना जाय लागत हूँ पदको,

जय जय श्री गणराज विध्यासुखदाता,

धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता,

अष्टो सिद्धि दासी संकटको बैरी,

विघनाविनाशन मंगल मूरत अधिकारी,

कोटि सूरजप्रकाश ऐसी छबि तेरी,

गंड-स्थल मदमस्तक झूले शाशिहारी,

जय जय श्री गणराज विध्यासुखदाता,

धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता,

भावभगत से कोई शरणागत आवे,

संतति सम्पति सभी भरपूर पावे,

ऐसे तुम महाराज मोको अति भावे,

गोसावीनंदन निशिदिन गुण गावे,

जय जय श्री गणराज विध्यासुखदाता,

धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता.

तू सुखकर्ता तु दु:खहर्ता आरती

तूं सुखकर्ता तूं दु:खहर्ता । विघ्नविनाशक मोरया ।

संकटी रक्षी शरण तुला मी । गणपतीबाप्पा मोरया ।। ध्रु ।।

मंगलमूर्ती तूं गणनायक । वक्रतुंड तूं सिद्धिविनायक ।

तुझिया दारी आज पातलों । देई चित्त मज ध्याया ।। १ ।।

तूं सकलांचा भाग्यविधाता । तूं विद्देचा स्वामी दाता ।

ज्ञानदीप उजळुनी आमुचा । निमवी नैराश्याला ।। २ ।।

तूं माता तूं पिता जागीं या । ज्ञाना तूं सर्वस्व जागीं या ।

पामर मी वर उणे भासती । तुझी आरती गाया ।। ३ ।।

मंगलमूर्ती मोरया । गणपतीबाप्पा मोरया ।

aarti-sangrah-download
aarti sangrah download – https://vidpixi.com/

जय गणेश देवा

जय गणेश जय गणेश

जय गणेश देवा

माता ज्याकी पार्वती पिता महादेवा

एकदंत दयावंत चार भुजा धारी

माथेपर तिलक सोहे मुसे की सवारी

पान चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा

लढूअन का भोग लगे संत करे सेवा

अंधे को आँख देत कोढिन को काया

बांझन को पुत्र देत निर्धन को माया

सूर शाम शरण आये सफल कीजिये सेवा

माता ज्याकी पार्वती पिता महादेवा

जय गणेश जय गणेश

जय गणेश देवा

माता ज्याकी पार्वती पिता महादेवा

प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया

प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया

विघ्नविनाशक, गुणिजन पालक, दुरित तिमिर हारका

सुखकारक तू, दुःख विदारक, तूच तुझ्यासारखा

वक्रतुंड ब्रम्हांडनायका, विनायका प्रभुराया

सिद्धिविनायक तूच अनंता, शिवात्मजा मंगला

सिंदूर वदना, विद्याधिशा, गणाधिपा वत्सला

तुच ईश्वरा साह्य करावे, हा भवसिंधु तराया

गजवदना तव रूप मनोहर, शुक्लांबर शिवसुता

चिन्तामणी तू अष्टविनायक, सकलांची देवता

रिद्धि सिद्धीच्या वरा दयाळा, देई कृपेची छाया

video credit – BHAJAN SAGAR [DEVOTIONAL TOUCH]

शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।

वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां।।

लावण्यसुंदर मस्तकीं बाळा।

तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।1।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा।।

आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।।

कर्पुगौरा भोळा नयनीं विशाळा।

आर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा।

विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा।

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय. ।।2।।

देवी दैत्यीं सागरमंथन पैं केलें।

त्यामाजी जें अवचित हळाहळ उठिलें।

तें त्वां असुरपषं प्राशन केलें।

नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें।। जय. ।।3।।

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी।

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी।

शतकोटीचें बीज वाचे उच्चारी।

रघुकुलतिलक रामदासा अंतरी।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा।।4।।

श्री देवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी।

अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी।

वारी वारी जन्म मरणांते वारी।

हारी पडलो आता संकट निवारी॥१॥

जय देवी जय देवी महिषा सुरमथिनी।

सुरवर ईश्र्वर वरदे तारक संजीवनी॥धृ॥

तुजवीण भुवनी पाहता तुज ऐसे नाही।

चारी श्रमले परंतु न बोलवे काही।

साही श्रमले परंतु न बोलवे काही।

साही विवाद करिता पडले प्रवाही।

ते तू भक्तालागी पावसी लवलाही॥२॥

प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदासा।

क्लेशांपासूनी सोडवी तोडी भवपाशा।

अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा।

नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा॥३॥

श्री महालक्ष्मीची आरती

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी

वससी व्यापकरूपे राहे निश्चलरूपे तू स्थूलसुक्ष्मी. जय.

करवीरपूर वासिनी सुरवर मुनिमाता

पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता

कमलाकारे जठरी जन्मविला धाता

सहस्त्र वदनी भूधर नपुरे गुणगाता. जय.

मातुल्लिंग गदा खेटक रविकिरणी

झळके हाटकवाटी पीयुष रसपाणि

माणिक रसना सुरंग वसना मृगनयनी

शशीकर वदना राजस मदनाची जननी. जय.

तारा शक्ती अगम्या शीवभजका गौरी

सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी

गायत्री नीजबीजा निगमागमसारी

प्रगटे पद्मावती निजधर्माचारी. जय.

अमृत भरिते सरिते अघदुरिते वारी

मारी दुर्घट असुरा भवदुस्तर तारी

वारी माया पटल प्रणमत परिवारी

हे रूप चिद्रुप दावी निर्धारी. जय.

चतुराननाने कुश्चित कर्मांच्या ओळी

लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी

पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी

मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी. जय.

दशावतारांची आरती

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।

भक्त संकटिं नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥ ध्रु० ॥

अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी ।

वेद नेले चोरूनि ब्रह्मया आणुनियां देसी ॥

मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।

हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ आरती० ॥ १ ॥

रसातळासी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।

परोपकरासाठीं देवा कांसव झालासी ॥

दाढें धरुनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी ।

प्रल्हादाकारणें स्तंभीं नरहरि गुरगुरसी ॥ आरती० ॥ २ ॥

पांचवे अवतारीं बळिच्या द्वाराला जासी ।

भिक्षे स्थळ मागुनीं बळीला पाताळा नेसी ॥

सर्व समर्पण केलं म्हणुनी प्रसन्न त्या होसी ।

वामनरूप धरुनी बळिच्या द्वारीं तिष्ठसी ॥ आरती० ॥ ३ ॥

सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला ।

कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला ॥

निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।

सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ आरती० ॥ ४ ॥

मातला रावण सर्वां उपद्रव केला ।

तेहतिस कोटी देव बंदी हरिलें सीतेला ॥

पितृवचनालागीं रामें वनवास केला ।

मिळोनि वानरसहित राजा राम प्रगटला ॥ आरती० ॥ ५ ॥

देवकीवसुदेवबंदीमोचन त्वां केलें ।

नंदाघरीं जाउनी निजसुख गोकुळा दिधलें ।

गोरसचोरी करितां नवलक्ष गोपाळ मिळविले ।

गोपिकांचें प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ आरती० ॥ ६ ॥

बौद्ध कलंकी कलियुगीं झाला अधर्म हा अवघा ।

सोडुनी दिधला धर्म म्हणुनी न दिससी देवा ॥

म्लेंच्छमर्दन करिसी ह्मणोनि कलंकी केशवा ।

बहिरवि जान्हवी द्यावी निजसुखानंदाची सेवा ॥ आरती० ॥ ७ ॥

आरती ज्ञानराजा

आरती ज्ञानराजा |

महाकैवल्यतेजा |

सेविती साधुसंत ||

मनु वेधला माझा || आरती || धृ ||

लोपलें ज्ञान जगी |

हित नेणती कोणी |

अवतार पांडुरंग |

नाम ठेविले ज्ञानी || १ || आरती || धृ ||

कनकाचे ताट करी |

उभ्या गोपिका नारी |

नारद तुंबर हो ||

साम गायन करी || २ || आरती || धृ ||

प्रकट गुह्य बोले |

विश्र्व ब्रम्हाची केलें |

रामजनार्दनी |

पायी मस्तक ठेविले |

आरती ज्ञानराजा |

महाकैवल्यतेजा || सेविती || ३ ||

आरती विठ्ठलाची

येई हो विठ्ठले माझे माउली ये ||

निढळावरी कर ठेवूनि वाट मी पाहे ||

आलिया गोलिया हाती धाडी निरोप |

पंढरपुरी आहे माझा मायबाप || १ ||

पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला |

गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला || २ ||

विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी ||

विष्णुदास नामा जीवेभावे ओवाळी || ३ ||

असो नासो भाव आम्हा तुज्या थाया

कृपाद्रिष्टि पाहे माझा पंढरीराया

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥

विठोबा आरती

युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।

चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ।

रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।

तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी ।

कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।

देव सुरवर नित्य येती भेटी ।

गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।।

जय देव ।। 2।।

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।

सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।

राई रखुमाबाई राणीया सकळा ।

ओवळिती राजा विठोबा सावळा।।

जय देव ।।3।।

ओवाळू आरत्या विठोबा सावळा ।।

जय देव ।।3।।

ओवाळू आरत्या कुर्वड्या येती ।

चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।

दिंड्या पताका वैष्णव नाचती ।

पंढरीचा महिमा वर्णावा किती ।।

जय देव ।।4।।

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।

चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती।।

दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती।

केशवासी नामदेव भावे ओंवळिती।।

जय देव जय देव ।।5।।

श्री गुरुदत्त आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रेलोक्य राणा ।।

नेती नेती शब्द न ये अनुमाना । सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ।।१।।

जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता। आरती ओवाळिता हरली भवचिंता। जय देव जय देव।

सबाह्य अभ्यंतरीं तू एक दत्त। अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।।

परा ही परतली तेथे कैंचा हा हेत । जन्मरमरण्याचा पुरलासे अंत ।।२।। जय देव जय देव

दत्त येऊनिया उभा ठाकला । सद्भावे साष्टांग प्रणिपात केला ।।

प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिधला । जन्ममरण्याचा फेरा चुकविला ।।३।। जय देव जय देव

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान। हारपले मन झाले उन्मन ।।

मीतूंपणाची झाली बोळवण । एका जनार्दनीं श्री दत्त ध्यान ।।४।। जय देव जय देव

Aarti Sangrah in Marathi | आरती संग्रह (संपूर्ण)

मंत्रपुष्पांजली

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।

ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा : ।।

ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने ।

नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।

स मस कामान् काम कामाय मह्यं।

कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय ।

महाराजाय नम: ।

ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं

वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं

वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं

समंतपर्यायीस्यात् सार्वभैम: सार्वायुष आं

तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति

तदप्येष: श्लोको भिगीतो मरूत: परिवेष्टारो

मरूतस्यावसन् गृहे ।

आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति ।।

एकदंतायविघ्महे वक्रतुण्डाय धीमहि ।

तन्नोदंती प्रचोदयात् ।

मंत्रपुष्पांजली समर्पयामि ।।

।। गणपतिबाप्पा मोरया ।।

घालिन लोटांगण

घालीन लोटांगण वंदीन चरण ।

डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।

प्रेमें आलिंगीन आनंद पूजन ।

भावे ओवाळिन म्हणे नामा ।।

त्वमेव माता पिता त्वमेव ।

त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।

त्वमेव सर्वं मम देवदेव ।।

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ।

बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।

करमि यद्यत् सकलं परस्मै ।

नारायणायेती समर्पयामि ।।

अच्युतं केशवं राम नारायणम्

कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।

श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम्

जानकीनायकं रामचंद्र भजे ।।

हरे राम हरे राम राम राम हरे हरे

हरे कृष्ण हरे कृष्ण कृ्ष्ण कृ्ष्ण हरे हरे ।।

।। मंगलमुर्ती मोरया ।।

।। गणपतिबाप्पा मोरया ।।

निरोपपर आरती

जाहले भजन आम्ही नमितो तव चरण ।

वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ॥धृ॥

दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातो

प्रेमे करुनिया देवा गुण तुझेची गातो ॥१॥

तरी द्यावी सिद्धी देवा हेची वासना, देवा हेची वासना

रक्षुनियां सर्वां द्यावी आम्हासी आज्ञा ॥२॥

मागणे ते देवा एकची आहे आता एकची आहे

तारुनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहे ॥३॥

जेव्हां सर्व आम्ही मिळूं ऐशा या ठाया ऐशा या ठाया

प्रेमानंदे लागू तुझी कीर्ति गावया ॥४॥

सदा ऐशी भक्ति राहो आमुच्या मनी देवा आमुच्या मनी

हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी ॥५॥

वारुनिया संकटॆ आता आमुची सारी आता आमुची सारी

कृपेची सा‌ऊली देवा दीनावरि करी ॥६॥

निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी चिंता तुम्हा असावी

आम्हां सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ॥७॥

निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी देवा आज्ञा असावी

चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी ॥८॥

जय जय रघुवीर समर्थ

सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा।। उपेक्षू नको गूणवंता अनंता ।

रघुनायका मागणे हेचि आतां ।।

कैलास राणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथा मुकुटी झळाळी । कारुण्य सिंधू भवदुःखहारी |

तुझवीण शंभी मज कोण तारी ।।

मोरया मोरया मी बाळ तान्हें । तुझीच सेवा करू काय जाणे|| अन्याय माझे कोट्यानुकोटी

मोरेश्वरा बतूघाल पोटी।।

ज्या ज्या ठीकाणी मन जाय माझे। त्या त्या ठीकाणी निजरुप तुझे ।। मी ठेवितो मस्तक ज्या ठीकाणी

तेथे तुझे सदगुरुपाय दोन्ही ।।

अंलकापुरी पुण्य भूमी पवित्र । तिथे नांदती ज्ञानराजा सुपात्र ।। तया आठविता महापुण्यराशी ।

नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी ।।

Aarti Sangrah in Marathi | आरती संग्रह (संपूर्ण)

श्री गणपती स्त्रोत्र

साष्टांग नमन हे माय गौरीपुत्रा विनायका । भव-तीने स्मरतां नित्य आयुःकामार्थ साधती |1911

प्रथम नांव वक्रतुंड दुसरे एकदंत ते ।

तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथें गजवक्र तें ||२|| पाचवें श्रीलंबोदर सहावें विकट नांव ते ।।

सातवें विघ्नराजेंद्र आठवें धूम्रवर्ण तें ॥३ नववे श्रीभालचंद्र दहावें श्रीविनायक ।

अकरावें गणपति बारावें श्रीगजानन ॥४॥ देवनावें अशी बारा तीन सध्या म्हणे नर।

विघ्नभीति नसे त्याला प्रभो। तूंसर्वसिध्दीत ॥५॥ विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन।

पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ||६||

जपतां गणपतिस्त्रोत सहा मासात हे फळ।

एक वर्ष होता मिळे सिध्दी न संशय ।७।।

नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्त्रोत हे । श्रीधराने मराठीती पठण्या अनुवादिले II८II

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञे तोषावें ।

तोषोनि मज द्यावे पसायदान हे ” जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढी ।

भूतांपरस्परें पडी | मैत जीवांचे ।।

दुरिताचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । – जीजें वांछील तो ते लाहो । प्राणिजाता। वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी | भेटतु या भुतां ॥ चला कल्पतरूंचे अरव चेतना चिंतामणीचें गांव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।

चंद्रमे जे अलांछन । मार्तड जे तापहीन । ते सर्वाही सदा सज्जन | सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी | पूर्ण होऊनि तिहीं लोकीं।

भजिजी आदीपुरुखी । अखंडीत ।।

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकी ईयें ।

द्दष्टाद्दष्ट विजयें होआवें जी ।।

तेथे म्हणे श्रीविश्वेशरावी हाहोईल दानपसावी ।

येणेवरे ज्ञानदेवी | मुखिया जाला ।।

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञे तोषावें ।

तोषोनि मज द्यावे पसायदान हे ” जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढी ।

भूतांपरस्परें पडी | मैत जीवांचे ।।

दुरिताचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । – जीजें वांछील तो ते लाहो । प्राणिजाता। वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी | भेटतु या भुतां ॥ चला कल्पतरूंचे अरव चेतना चिंतामणीचें गांव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।

चंद्रमे जे अलांछन । मार्तड जे तापहीन । ते सर्वाही सदा सज्जन | सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी | पूर्ण होऊनि तिहीं लोकीं।

भजिजी आदीपुरुखी । अखंडीत ।।

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकी ईयें ।

द्दष्टाद्दष्ट विजयें होआवें जी ।।

तेथे म्हणे श्रीविश्वेशरावी हाहोईल दानपसावी ।

येणेवरे ज्ञानदेवी | मुखिया जाला ।।

Aarti Sangrah in Marathi | आरती संग्रह (संपूर्ण)

श्रीगणेश १०८ नामावली

१) विघ्नेशाय नमः

२)वियबरदाय नमः

३) विश्वचक्षुषे नमः

४) जगत्प्रभवे नमः

५) हिरण्यरूपाय नमः

६)सर्वात्मने नमः

७)ज्ञानरूपाय नमः

८)जगन्मयाय नमः

९)ऊध्वरेतसे नमः

१०)महाबाहवे नमः

११) अमेयाय नमः

१२) अमितविक्रमाय नमः

१३) वेदवेद्याय नमः

१४)महाकालाय नमः

१५) विद्यानिधय नमः

१६)अनामयाय नमः

१७) सर्वज्ञाय नमः

१८) सर्वगाय नमः

१९)शांताय नमः

२०) गजास्याय नमः

२१) चित्तेवराय नमः

२२)विगतज्वराय नमः

२३) विश्वमूर्तये नमः

२४) अमेयात्मने नमः

२५)विश्वाधाराय नमः

२६) सनातनाय नमः

२७)सामगाय नमः

२८) प्रियाय नमः

२९)मंन्त्रिणे नमः

३०) सत्त्वाधाराय नमः

३१) सुराधीशाय नमः

३२) समस्तसाश्रिणे नमः

३३) निद्वाय नमः

३४) निलोकाय नमः

३५)अमोघविक्रमाय नमः

३६) निर्मलाय नमः

३७) पुण्याय नमः

३८) कामदाय नमः

३९)कांतिदाय नमः

४०)कामरूपिणे नमः

४१)कामपोषिणे नमः

४२)कमलाक्षाय नमः

४३) गजाननाय नमः

४४) मुमुखाय नमः

४५)शर्मदाय नमः

४६) मूवकाधिपवाहनायन

४७)शध्दाय नमः

४८) दीर्घतुंडाय नमः

४९) श्रीपतये नमः

५०) अनंताय नमः

५१) मोहबर्जिताय नमः

५२) वक्रतुंडाय नमः

५३) शूर्पकर्णाय नमः

५४) परमाय नमः

५५) योगीशाय नमः

५६) योगधामे नमः

५७) उमासुताय नमः

५८) आपध्दंने नमः

५९) एकदंताय नमः

६०)महाग्रीवाय नमः

६१)शरण्याय नमः

६२)सिध्दसेनाय नमः

६३) सिध्दवेदाय नमः

६४) करुणाय नमः

६५) सिध्दाय नमः

६६) भगवते नमः

६७) अव्ययाय नमः

६८)विकटाय नमः

६९) कपिलाय नमः

७०) टुंडिराजाय नमः

७१) उग्राय नमः

७२) भीमोदराय नमः

७३)शुभाय नमः

७४) गणाध्यक्षाय नमः

७५) गणेशाय नमः

७६) गणाराध्याय नमः

७७) गणनायकाय नमः

७८)ज्योतिःस्वरूपाय नमः

७९)भूतात्मने नमः

८०) धूम्रकेतवे नमः

८१)अनुकूलाय नमः

८२) कुमारगुरवे नमः

८३)आनंदाय नमः

८४) हेरंबाय नमः

८५) वेदस्तुताय नमः

८६) नागयज्ञोपवीतिने नमः

८७) दुर्धर्षाय नमः

८८)बाल कुरप्रियाय नमः

८९)भालचंद्राय नमः

९०) विवधाने नमः

९१) शिवपुत्राय नमः

९२) विनायकाय नमः

९३) लीलासेविताय नमः

९४) पूर्णाय नमः

९५) परमसुंदराय नमः

९६) विघ्नांधकाराय नमः

९७) सिंदुरवरदाय नमः

९८) नित्यात नमः

99) विभवे नमः

१००)प्रथमपूजिताय नमः

१०१) दिव्यपादाब्जाय नमः

१०२) भल्ममंदराय नमः

१०३)शूमहाय नमः

१०४) रत्नसिंहासनाय नमः

१०५) मणिकुंडलमंडिताय नमः

१०६) भक्तकल्याणायनमः

१०७) अमेयायनमः

१०८) कल्यागुरवे नमः

Aarti Sangrah in Marathi | आरती संग्रह (संपूर्ण)

श्री गणेशाची आरती, देवीची आरती, श्री शंकराची आरती, श्री दत्ताची आरती, श्री विठ्ठलाची आरती, श्री रामचंद्राची आरती, श्री मारुतीची आरती, श्री ज्ञानदेवाची आरती, श्री तुकारामांची आरती, प्रार्थना (घालीन लोटांगण), मंत्र पुष्पांजली, श्री गणपत्यथर्वशीर्ष, श्री गणेश स्तोत्र, श्री मारुति स्तोत्र, पसायदान , Aarti Sangrah in Marathi | आरती संग्रह (संपूर्ण)

अजून वाचा – Ganesh Chaturthi 2021 | गणेशोत्सव