Benefits of Mint | पुदिन्याचे फायदे

Benefits of Mint

Benefits of mint | पुदिन्याचे फायदे – ही एक सुगंधी वनस्पती आहे. हिच्या तीक्ष्ण रसात मुख्यत: पेपरमिंट तेल व इतर रासायनिक द्रव्ये असतात. ग्रीक, रोमन, चिनी, जपानी लोक याचा फार पुरातन काळापासून उपयोग करीत होते. त्यांच्या तुलनेत भारतीयाना मात्र पुदिन्याची माहिती उशीराने मिळाली.

पुदिना हा रुचकर, हृदयाला हितकारक, उष्ण, दीपक, वायु व कफहारक, पित्त कारक, मलमूत्र रोखणारा, खोकला, अग्निमांद्य, संग्रहणी, अतिसार, कॉलरा, जीर्णज्वर इ. रोगात उपयुक्त असून कृमिनाश व ओकारी बंद करण्याचे हे एक उपयुक्त औषध आहे. मनाला प्रसन्न ठेवणारी, पचनशक्ती वाढविणारी व मातेच्या दुधात काही दोष निर्माण झाले असल्यास ते घालवून दुधाला निर्दोष करणारी ही वनस्पती आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक दूध अंगावर येत असल्यास पुदीन्याचा रस द्यावा. त्यामुळे अतिरिक्त दुधाचे शोषण होऊन दुधाचा जोर कमी होतो व ते संतुलित प्रमाणात येऊ लागते.

Benefits of mint | पुदिन्याचे फायदे

तोंडाला चव येण्यासाठी ताजा पुदीना + खारीक + मिरे + सैंधव मीठ + ओली काळी द्राक्षे किंवा काळ्या मनुका + जिरे अशी चटणी वाटून खावी. आवश्यक वाटल्यास यात थोडासा हिंग व लिंबू रस मिसळता येतो. या चटणीमुळे पचनशक्ती सुधारते, वायुविकार नाहीसे होतात व शरीराला फिक्केपणा आलेला असल्यास नाहीसा होतो. पुदीना + तुळस + मिरे + आले घालून केलेला काढा घेतल्यास नेहमी येणारा थंडी ताप, मुदतीचा ताप बरा होण्यास मदत होते. या काढ्याने साधारणत: कोणत्याही प्रकारचा ताप घाम येऊन उतरतो.. वायुविकार व सर्दी कमी होते.

पुदीना-उपयोग-मराठी

Benefits of mint पुदिन्याचे फायदे

न्युमोनियामुळे (त्रिदोषज्वरात) निर्माण होणाऱ्या अनेक विकारांना करण्यासाठी पुदीन्याचा ताजा रस १ चमचा + १ चमचा मध साधारणपणे दिवसातून ४-५ वेळा दिल्यास फायदा होतो. या उपायाने जीर्ण पोटदुखी, आतड्यांचे विकारही बरे होतात. पुदीन्याच्या या रसाचा कृमि नष्ट करण्यासाठी, खोकला, ओकारी, अतिसार, वायुविकार कमी करण्यासाठीही उपयोग होतो. पोटदुखी थांबवण्यासाठी १ चमचा पुदीन्याचा रस + १ चमचा आल्याचा रस + थोडेसे सैंधव मीठ मिसळून घेतल्यास पोटदुखी थांबते. कॉलऱ्याची साथ चालू असल्यास पुदीन्याचे सरबत करून प्यावे.

सर्दी  झाली असल्यास पुदीन्याच्या रसाचे २/२ थेब नाकात सोडावे.

नायट्यावर पुदीन्याचा रस वरचेवर चोळावा. विचूदंशाचा दाह कमी करण्यासाठीही याचा रस प्यायल्यास फायदा होतो. शास्त्रीय मतानुसार पुदीन्यात ए’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. तुळशीच्या खालोखाल  ही एक अशी वनस्पती आहे की जिच्यामुळे अनेक रोगापासून सुटका होऊ शकत.

Benefits of mint | पुदिन्याचे फायदे

ओव्यामध्ये असणारे बहुतेक सर्व गुणधर्म पुदीन्यात आहेत. पुदिना हा जठराग्नी प्रदीप्त करून उदररोगाचा नाश करणारे हे एक अप्रतिम व रामबाण औषध आहे. लैंगिक शक्ती वाढविण्यासाठीही याचा काही प्रमाणात उपयोग होतो. कडुनिब + पुदीना यांची चटणी करून खाल्ल्यास रक्तशुद्धी होते व त्वचाविकार नाहीसे होतात.

त्वचेचे आरोग्य सुधारून सौंदर्यवृध्दि साधायची असल्यास पुदीन्याचा रस घ्यावा.

केवळ पुदीन्याच्या पानांचा चहा घेतल्यास सर्दी-पडसे, वरचेवर होणारा वेदनायुक्त असा पाळीचा त्रास, उचकी यासाठीही उपयोग होतो. लोहाचा अभाव (अॅनिमिया) कृमि विकार, मळमळ, उन्हाळ्यातील अतिसार, अपचन, गॅसेस यासाठी पुदीन्याचा रस १ चमचा + २ चमचे मध + अर्धा चमचा लिंबाचा रस असे मिश्रण घेतल्यास उत्तम उपयोग होतो. त्वचेचे आरोग्य सुधारून सौंदर्यवृध्दि साधायची असल्यास पुदीन्याचा रस घ्यावा.