Best Marathi Quotes and Suvichar | सुंदर सुविचार मराठी – Marathi Dnyankosh, Marathi Suvichar – सुंदर मराठी सुविचार संग्रह – (Suvichar in Marathi, Best Marathi Quotes and Suvichar)
कॉफी पिताना कधी कधी शेवटच्या घोटापर्यंत तिचा कडवटपणा बेचैन करतो, आणि मग कपाच्या तळाशी साखर दिसते… जीचा काहीच उपयोग नसतो.. मला वाटते आयुष्याचेही तसेच आहे.. आनंद खूप आहे.. पण वेळीच नीट ढवळून पाहण्याची गरज आहे….
“वेदांचा”अभ्यास करणं खुप सोपं आहे
परंतु
ज्यादिवशी आपण दुसऱ्यांच्या “वेदनांचा” अभ्यास करू
त्यादिवशी “ईश्वर”भेटला असे समजा…!!!
सगळ्यांनी साथ सोडली,
तेव्हा माणुसकी कळली,
पावसात गरमा गरम चहा प्यायलो,
तेव्हा आयुष्याची मजा कळली
पैसे नसताना वेगळी किंमत,
पैसे असताना वेगळी किंमत,
तेव्हा माणूस म्हणून जगण्याची गम्मत कळली.
मनात भरून आलेलं सार आभाळ मोकळं व्हायला कधी कधी,आपल्या माणसाने केलेली साधी विचारपूस पण पुरेशी असते…!
जगात दोन अशी रोपं आहेत,
जी कधी कोमेजत नाहीत आणि कोमेजली तर त्याचा काही इलाज नाही…
पहिलं निःस्वार्थ मैत्री आणि दुसरं अतूट विश्वास…..
प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे,
मान दिला पाहिजे, बोलताना शब्दांचा जपून वापर केला पाहिजे.
शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे.
माणसाला सुंदर दिसण्यासाठी
सुंदर असणं महत्वाचं नसतं
तर महत्वाचं असतं ते सुंदर नि
तितकचं निरागस मन आणि त्यावर
जर निर्मळ हास्य असेल तर
जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही !!
मनात खूप काही असतं सांगण्यासारखं
पण….
काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
आतलं दुःख मनात ठेवून अश्रू
लपवण्यातच आपलं भलं असतं ..
एकांतात रडलं तरी चालेल
लोकांमध्ये मात्र हसावंच लागतं…
जीवन हे असंच असतं ते आपलं असलं
तरी इतरांसाठी जगावं लागतं …
घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल
तर ती आहे ज्ञान !
देण्यासारखी कोणती गोष्ट असेल
तर ती आहे दान !
बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल
तर ती आहे सत्य !
करण्यासारखी कोणती गोष्ट असेल
तर ती आहे दया !
सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर
अहंकार !
ज्याचे जसे चरित्र असते,
त्याचे तसेच मित्र असतात.
शुध्दता तर विचारांमध्ये असते.
माणूस कुठे पवित्र असतो,
फुलातसुध्दा किडे असतात,
दगडातसुध्दा हिरे असतात.
वाईट सोडून चांगले बघा.
माणसातसुध्दा देव दिसेल…
“साधेपणा” ही सगळ्यापेक्षा
चांगली सुंदरता आहे.
“क्षमा” ही सगळ्यांपेक्षा
चांगली शक्ती आहे.
“विनम्रता” हा सगळ्यात
चांगला स्वभाव आहे
आणि ” आपलेपणा ” हे
सर्वात श्रेष्ठ नातं आहे
चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो….
मग
संकट कितीही मोठ असु द्या..
फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवा……
एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून दुःखी राहू नये. आपलीच अपेक्षा चुकीची होती असं समजून अपेक्षा ठेवणं सोडून द्यावी. परिस्थिती स्वतःलाच बदलावी लागते. कारण मनासारखे दिवस पहाण्या साठी मनाविरूद्ध घडणारे दिवस सोसावे लागतात….!!
भजनात सुरपेटी एकटी असून चालत नाही , त्याला जोड टाळ – मृदुंगाची लागते.
तसेच आपण जीवनात एकटे असून चालत नाही , आपल्याला जीवनप्रवास चांगला होण्यासाठी चांगल्या मित्रांची व प्रेमळ कुटुंबियांची साथ आवश्यक असते.
✍️आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही,….
फक्त कोणतेही कर्म करत असताना नितिमत्ता साफ ठेवून ते करावे परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही.
अजून वाचा – सुंदर सुविचार मराठी
Leave a Reply