Best Marathi Suvichar | सुंदर सुविचार मराठी – Marathi Dnyankosh

Marathi Dnyankosh

Best Marathi Suvichar | सुंदर सुविचार मराठी – Marathi Dnyankosh, Marathi Suvichar – सुंदर मराठी सुविचार संग्रह – (Suvichar in Marathi, Best Marathi Quotes and Suvichar)

खिश्यात कितीही नोटा आल्या तरी
नशिबाचा टॉस करायला
रुपायाच लागतो
पतंग आणि व्यक्ती जास्त हवेत गेला की
त्याचा पत्ता आपोआप कट होतो!
वय आणि पैसा
यावर कधीच गर्व करू नये
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात…
त्या नक्कीच संपतात !!
💐🙏🏽


सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी करावी…
पहिली म्हणजे कालचे वाईट
प्रसंग विसरून..
आणि दुसरे म्हणजे आज काहीतरी
नवीन चांगले करावे हे
मनात ठेवून…..


मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात..


🍃🍂🌸🌺🌸🍃🍂
विश्वास ठेवा….
आपण जेव्हा कोणासाठी
काही चांगल करत असतो, 🍃🍂🌺🌸🌸🍃
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी
काही चांगल घडत असतं.
इतकचं की
ते आपल्याला दिसत नसतं.
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂


काही आठवणी विसरता येत नाहीत,
काही नाती तोडता येत नाहीत.,
माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत,
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत,
वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत,
पावल अडखलली तरी चालणं नाही थांबत,
अंतर वाढलं म्हणून प्रेम नाही आटत,
बोलण नाही झालं तरी आठवण नाही थांबत,…


✍️ 🚩 यशस्वी जीवनाची चार सूत्र:
मेहनत केली तर धन मिळते ,
संयम ठेवला तर काम होते,
गोड बोलले तर ओळख होते ,
आदर केला तर नाव होते …


वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे
म्हणून वेळ चांगली असेल तर गर्व करू नका आणि वाईट वेळी चिंता करू नका
दोन्ही बदलणार आहे


✍🏻… चप्पल चोरीला जाते म्हणून मंदिरात जाणे टाळायचे नसते,
आणि..
🌺Reply मिळत नाही म्हणून massage करणे सोडायचे नसते..

💞नात्यांच्या बागेत एक नाते कडुलिंबाचे पण लावा..
🍁जे अनुभव भले कडवे देईल,
पण अडचणीत तेच उपयोगी येईल.


मानवी जीवन यशस्वी व्हायचा
तडजोड हाही एक मार्ग आहे……
माणसाने ती करायला शिकलं पाहिजे;
जिथं जिथं तडा जाईल,
तिथं तिथं जोड देता आला की,
कुठलंच नुकसान होत नाही..!!
तडजोड म्हणजे शरणागती नव्हे,
तर ती परिस्थितीवर केलेली
मात असते..!!


ज्यावेळी माणूस स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता कार्य करतो त्यावेळी त्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडते.                               
शंभर वर्षे जिवंत रहाण्यासाठी शंभर वर्षे जगणे गरजेचे नाही, काहीतरी चांगले काम करा कि लोक तुम्हाला शंभर वर्षे लक्षात ठेवतील….


किती पैसा कमावला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा? याचे फार छान उत्तर संत तुकाराम महाराजानी दिले आहे, नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आईवडिलांची काळजी घेता यावी.
अब्रूने जगता यावे, आवडत्या व्यक्तीला वेळ देता यावा, मन मोकळ्या गप्पा मारता याव्या, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा.


ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते,म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा.
सुंदर चेहरा म्हातारा होतो,बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं,पद सुद्धा एक दिवस निघून जातं परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो..!!


अजून वाचा – सुंदर सुविचार मराठी