Ganesh Chaturthi 2022 | गणेशोत्सव

Ganesh-Chaturthi-गणेशोत्सव-000

Ganesh Chaturthi | गणेशोत्सव – भाद्रपद शुद्ध चतुर्थीस श्रीगणरायाचे आगमन होते, म्हणून या चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणतात. प्रत्येक पक्षातील चतुर्थीस विशिष्ट नावे आहेत. शुक्ल पक्षातील चतुर्थीस विनायकी व कृष्ण पक्षातील चतुर्थीस संकष्टी. मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. भाद्रपद व माघ महिन्यातील चतुर्थी विशेष मानल्या जातात.

Ganesh Chaturthi 2022 | गणेशोत्सव – गणपतीविषयी प्रचलित असलेल्या कथा

सत्याने व न्यायाने वागणाऱ्या लोकांच्या जीवनात जे अडथळे निर्माण होतात, विघ्ने उद्भवतात त्यांचा नायनाट कसा करता येईल याची एकदा देवांना फार मोठी विवंचना पडली. अनेक विचार केले पण त्यावर काही उपाय सुचेना. तेव्हा सगळे देव भगवान शंकराकडे गेले. शंकराने अनिमिप नेत्रांनी पार्वतीकडे पाहिले. त्याचवेळी त्यांच्या मखातुन एक तेजस्वी पुत्र प्रकट झाला, त्याच सौदर्य इतके अलौकिक होते की स्वर्गातील देवतादेखील त्याच्यावर मोहित झाल्या. हे पाहून पार्वती संतापली आणि तिने त्याला शाप दिला, ‘तू लंबोदर आणि सर्पाचे जानवे घालणारा होशील.’

हा शाप ऐकून भगवान शंकर भयंकर संतापले आणि या रागाच्या भरात त्यांनी आपला देह घुसळला तेव्हा त्या शरीराच्या सर्व भागांतून हत्तीचे शिर असलेले अनेक विनायक निर्माण झाले आणि त्यामुळे पृथ्वी प्रक्षुब्ध झाली. ब्रह्मदेवाने शंकराला विनंती केल्यामुळे शंकराने आपल्या मुखातून उत्पन्न केलेल्या आपल्या पुत्राला त्या विनायकांचा सेनापती केले आणि प्रत्येक शभ व मंगल कार्याच्या वेळी सर्वप्रथम तुझी पूजा केली जाईल, असा आशीर्वाद दिला. ज्या दिवशी गणपतीचा जन्म झाला, तो दिवस गणेश चतुर्थी म्हणून मानण्यात येऊ लागला.

Ganesh Chaturthi 2022 | गणेशोत्सव दुसरी कथा :

एके दिवशी पार्वती स्नान करावयास न्हाणीघरात जातेवेळी तिथे इतर कोणी येऊ नये म्हणून तिने आपल्या अंगाच्या मळीपासून एक पुतळा तयार केला आणि त्याला बाहेर रखवाली करण्यासाठी ठेवले. थोड्याच वेळात भगवान शंकर तेथे आले. त्या रखवालदाराने पार्वतीच्या हुकुमाप्रमाणे शंकराला आत जाऊ दिले नाही. याचा शंकराला राग आला. क्रोधाच्या आवेशात त्यांनी त्या रखवालदाराचे शिरच उडविले. काही वेळाने पार्वती आपली आंघोळ उरकून बाहेर आली आणि रखवालदाराची अवस्था पाहून ती संतापली. तो पुतळा म्हणजे पार्वतीचा मानसपुत्र होता.

इतक्या वेळात शंकर अतिशय शांत झाले होते. जवळच त्यांचा गण नावाचा नोकर होता. त्याला शंकरांनी आज्ञा केली की, प्रथम जो कुणी भेटेल त्याचे मस्तक कापून घेऊन ये. त्याप्रमाणे तो निघाला, त्याला प्रथम हत्ती दिसला. त्याने त्याचे शिर कापून आणले. शंकरांनी ते मुंडके त्या पुतळ्याला लावले. ते हत्तीचे-गजाचे-आनन म्हणजे तोंड होते. म्हणून गजानन हे नाव पडले. शंकराने त्याला आपल्या गणांचा ईश म्हणजे प्रमुख केले. म्हणून त्याला गणेश म्हणू लागले. तो दिवस चतुर्थीचा होता.

महिषासर नावाचा महाभयंकर राक्षस होता. तो लोकांना फार त्रास देत असे. म्हणन देवीने त्याचा वध केला. त्याचा पुत्र गजासुर सर्व देवांचा द्वेष करी. सर्व देवांचा समल नाम करण्यासाठी त्याने भगवान शंकराची आराधना केली. भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले व त्याला तुला कुणाकडूनही मरण येणार नाही व ब्रह्मांडाचे राज्यले असा वर दिला. त्यामुळे गजासुर अतिशय उन्मत्त झाला.

त्याने सर्व देवांना व शेवटी शंकरालाही पळवून लावले. त्यामुळे सर्व देव घाबरले व अरण्यात निघून गेले. तिथे त्यांनी श्रीगणपतीची प्रार्थना केली. गणराया प्रसन्न झाले व त्यांनी त्या उन्मत्त झालेल्या गजासुराचा नि:पात केला. तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा होता. सर्वांचे संकट निवारण झाले. म्हणून तेव्हापासून दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीस गणपतीची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. त्या दिवशी सोन्या-रुप्याची अथवा मातीची गणपतीची मूर्ती आणावी. ती पूर्व-पश्चिम किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवावी. पूजेकरिता चंदन, दूर्वा, सुगंधी फुल, केतकी, तुळस, शेंदर, शमी, निरनिराळ्या एकवीस प्रकारची पत्री, बुक्का, पंचामृतः। व इतर पूजेचे साहित्य तयार करून पुरोहिताकडून अथवा घरातील जाणत्या व्यक्तीकडून साळा उपचारांनी पूजा करावी. फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला तुळस वाहिली तरी चालते. आरती म्हणावी. आरती झाल्यावर –

मोरेश्वरा बा मी बाळ तान्हे ।

तुझीच सेवा करू काय जाणे ।

अन्याय माझे कोट्यानुकोटी ।

मोरेश्वरा बा तू घाल पोटी।

ही प्रार्थना म्हणावी. नंतर लहानथोर मंडळींनी शमी, केतकी, दूर्वा, शेंदूर वाहावे व मोदकांचा नैवेद्य करावा. सायंकाळी धुपारती करावी. आपल्या यथाशक्तीप्रमाणे दीड-पाच-सात अथवा दहा दिवस गणपती ठेवून मनोभावे भक्तिपूर्वक आराधना करावी. विसर्जन करतेवेळी समुद्रात, नदीत अथवा तळ्यात दोन वेळा बुडवून वरखाली करावे व नंतर विसर्जन करावे. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घेऊ नये, असे पुराणातसांगितले आहे. कारण चंद्राने गणपतीला गजमुख का धारण केले ? असा थट्टेने प्रश्न विचारला. तेव्हा गणपतीने क्रोधाने शाप दिला की, तू ज्यांच्या दृष्टीस पडशील, ते पापी होतील व त्यांना अनेक संकटे भोगावी लागतील. हा शाप ऐकून चंद्र अतिशय द:खी झाला व त्याने गणपतीची आराधना केली. गणपती त्याला प्रसन्न झाला व त्याला वर दिला की, तू माझ्या भालस्थळी राहशील. आणि संकष्टीच्या (वद्य चतुर्थीच्या)। दिवशी माझे भक्त तुझे दर्शन घेऊनच अन्नग्रहण करतील. अशा त-हेने गणेशमहिमा सांगतात व साजरा करतात.

HEY VAKRATUND HEY LAMBODAR HEY NAMITO TUZ AADI DEV –
BHAJAN SAGAR [DEVOTIONAL TOUCH]

महाराष्ट्रामध्ये लो. टिळकांनी १८९२ सालापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू केली; यामुळे समाजात एकता व संघटनशक्ती निर्माण झाली. लो. टिळकांनी सामाजिक व अध्यात्माचा संगम करून जनसेवेच्या कार्याला नवी दिशा दाखविली. ज्या राष्ट्रीय उद्देशाने ही प्रथा सुरू केली, त्याला आज बीभत्स व अचकट विचकट स्वरूप येत आहे. या पवित्र सोहळ्यात रोंबासोबा’ सारखे अतिरेकी पकार करून धांगडधिंगा घातला जात आहे. हे अनिष्ट स्वरूप नष्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांनी व तरुणांनी स्वत:वर काही बंधने व नियम लादन घेऊन गणेशोत्सवासारख्या पवित्र उत्सवात कीर्तन, पोवाडे, व्याख्याने, साक्षरताप्रचार, अल्पबचत, दारूबंदी, अस्पृश्यतानिवारण, सार्वजनिक स्वच्छता. अशा अनेक सामाजिक चळवळी उभारून लोकजागृती, लोकशिक्षणाचे कार्य करावे. समाजसेवा व देशसेवा करून राष्ट्रउभारणीच्या पवित्र कार्यास सहकार्य करून सुसंकृत व आदर्श समाज घडविण्यास कटिबद्ध राहिले पाहिजे. अशा सद्हेतूने गणेशोत्सव साजरा करण्याची मोहीम सुरू केली तरच आत्मिक १ व मानसिक समाधान लाभेल व समाजहित साध्य करता येईल.

 Ganesh Chaturthi | गणेशोत्सव
Ganesh Chaturthi | गणेशोत्सव

गणपती उत्सवाचा हा आनंददायी सोहळा म्हणजे सण आणि उत्सव यांची सांगड घालून धर्म, समाज नि राष्ट्र यांच्या कल्याणाचा मार्ग दाखविणारा एक पवित्र सण होय.

श्री गणेशप्रिय दूर्वांमध्ये असलेले औषधी गुण : दूर्वा दोन जातीच्या असतात. एक पांढरी आणि एक निळी. दूर्वा अतिशय थंड असतात. नाकाचा घोणा फुटून रक्त येत असल्यास दूर्वांचा रस काढून खडीसाखर घालून घेतल्यास तेथांबते. टॉयफाईडमध्ये अंगाची फार आग होते, त्यावेळी अंगाची उष्णता कमी करण्यासाठी दूर्वांचा रस दिल्यास उष्णता कमी होते. लघवीला साफ होत नसल्यास दूर्वांचा रस घ्यावा. उष्णतेने जे त्वचा रोग होतात, त्यावेळी दूर्वांचा रस दिला असता बरे होते.

अजून वाचा – Aarti Sangrah in Marathi | आरती संग्रह (संपूर्ण)