Ganpati Pran Pratishtha Vidhi | श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी

Ganpati Pran Pratishtha Vidhi | श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी

Ganpati Pran Pratishtha Vidhi | श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी

गणेश चतुर्थी – भाद्रपद शुद्ध चतुर्थीदिवशी मातीची चांगली रंगविलेली शोभिवंत अशी श्री गणेशाची मूर्ति आणून, प्रशस्त ठिकाणी पूर्व, पश्चिम, उत्तर यापैकी एका दिशेकडे मुख करून स्थापना करावी. प्रेक्षणीय आरास, रांगोळी. मबलक प्रकाश करावा. रक्तचंदन, दूर्वा, सिंदूर, फुले, पत्री इत्यादी पूजासाहित्य घेऊन पुढीलप्रमाणे पूजा करावी,

 Ganpati Pran Pratishtha Vidhi | श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी

दोन वेळा आचमन करून, प्राणायाम करावा. देश कालाचा उच्चार करून – मम सकुटुंबस्य क्षेमस्थिति आयुरारोग्य ऐश्वर्यादि वृद्धि सर्वकाम निर्विघ्न सिद्धि पुत्र पौत्र धनधान्य समृद्धिद्वारा प्रतिवार्षिक विहित श्री सिद्धिविनायक देवताप्रीत्यर्थ ध्यानावाहनादी षोडषोपचारैः पूजां करिष्ये। असा हातात अक्षता उदक घेऊन संकल्प सोडावा.

कलश, शंख, घंटा, दीप यांचे पूजन करून कलशातील पाणी तुळशीपत्राने पूजासाहित्यावर व आजूबाजूस, आपल्या अंगावर प्रोक्षण करावे (शिंपडावे).

Ganpati Pran Pratishtha Vidhi | श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी

रक्तांभोधिस्थपोतोल्लसदरुण सरोजाधि रूढा कराब्जै पाशांकोदंड भिक्षूद्भवमथगुण मयंकुशं पंचबाणान् । बिभ्रणासृक्कपालं त्रिनयन लसिता पीनवक्षो रुहाढ्या देवी बालार्कवर्णा भवतु सुखकारी प्रणरुक्तिः परानः॥

याप्रमाणे ध्यान करून ॐ चा पंधरा वेळा उच्चार करून देवाच्या डोळ्यांना मधाने नेत्रोन्मीलन करावे. गंध, फूल, अक्षता, हळद, कुंकू, धूप, दीप दाखवून गूळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.

 Ganpati Pran Pratishtha Vidhi | श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी
Ganpati Pran Pratishtha Vidhi | श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी

षोडशोपचार पूजा

Ganpati Pran Pratishtha Vidhi | श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी

१) एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुज पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायक ध्यानं समर्पयामि – अक्षता वाहणे.

२) अवाहयामि विघ्नेशं सुरराजार्चितेश्वरं अनाथनाथं सर्वशं पूजार्थ गणनायकआवाहनं समर्पयामि – अक्षता वाहणे.

३) विचित्ररत्न खचितं दिव्यास्तरण संयुतं विघ्नराज गृहाणेदमासनं भत्तावत्सल आसनं समर्पयामि – अक्षता वाहणे.

४) सुगंधिसह कर्पूरमिश्रितं उत्तमं जलम्पा द्यं गृहाण देवेश प्रीयतां गणनायक – पाधं दूर्वानी किंवा फुलांनी पायाशी पाणी प्रोक्षण करावे.

५) अर्घ्यच फलसंयुक्तं गंधपुष्पाक्षत्रैर्वृतं गणाध्यक्ष नमस्तेस्तु गृहाण करुणानिधे- अर्घ्य गंध, अक्षता, फूल, पाणी, एकत्र करून प्रोक्षण करावे.

६) दध्याज्यमधु संयुक्तं मधुपर्क मयाहृतं गृहाण सर्व लोकेश गणनाथ नमोस्तुते – मधुपर्क दही, तूप, मध एकत्र करून प्रोक्षण करावे.

७) विनायक नमस्तुभ्यं त्रिदशैरभिवंदितं गंगोदकेन देवेश सद्य आचमनं कुरू – आचमनीयं पाणी प्रोक्षण करावे.

८) गंगोदकं समानीतं सुवर्णकलशे स्थितं. मलापकर्ष स्नानार्थ गृहाण वरदेश्वर – स्नानं पाणी प्रोक्षण करावे.

Ganpati Pran Pratishtha Vidhi | श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी

९) पयोदधि घृतं चैव शर्करा मध संयुक्तं स्नानार्थते प्रयच्छामि प्रीत्यर्थ प्रतिगृह्यता -पंचामृतं पंचामृत प्रीक्षण करावे.

१०) कर्पूरैला समायुक्तं सुगंधिद्रव्यसंयुतं गंधोदकं मया दत्तं स्नानार्थ प्रतिगृह्यतां-गंधोदक अत्तर लावून ऊन पाणी करून प्रोक्षण करावे. देवास गंध, अक्षता, हळद, कुंकू, फुले, दूर्वा, धूप, दीप दाखवून शिल्लक पंचामृताचा नैवेद्य दाखविणे. विडा, दक्षणा, फळे यावर उदक सोडणे-येथे पूर्व पूजा पूर्ण झाली. देवावरील फूल काढून उत्तरेस ठेवावे व अभिषेक करावा. (पुरुषसूक्त, अथर्वशीर्ष म्हणावे.)

११) रक्तवस्त्रद्वयं देव देवांग सदृशं प्रभो सर्वप्रद गृहाणेदं लंबोदर हरात्मज – वस्त्रं कापसाची वस्त्रे वाहणे.

१२) राजतं ब्रह्मसूत्रंच कांचनं चोत्तरीयकं गृहाण चारुसर्वज्ञ भक्तानां वरदोभव- यज्ञोपवीत डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली देवास जानवे घालणे.

१३) गंधं गृहाण भगवान् सर्वगंध समन्वितं गणाध्यक्ष नमस्तेस्तु भक्ताभिष्ट फलप्रद – गंध गंध लावणे.

१४) अक्षतान् धवलान् देव गृहाण द्विरदानन अनाथनाथ सर्वज्ञ गीर्वाण सुरपूजित – अक्षतां अक्षता वाहणे.

१५) हरिद्रा कुंकुमंचैव सिंदूरं कज्जलान्वितं मयानिवेदितं भक्त्या गृहाण परमेश्वर

हळद, कुंकू, सिंदूर, अबीर, बुक्का देवास वाहणे.

१६) सुगंधीनि सुपुष्पाणि रक्तवर्णानि यानिचः अर्पयामि महाभक्त्या स्वीकुरुष्व विनायक – पुष्पाणि देवास फुले, दूर्वा व पत्रि, कमळ, केवडा, शमी वाहणे. नंतर देवास धूप, दीप, मोदकाचा नैवेद्य, विडा, सुपारी, दक्षिणा, निरनिराळी फळे अर्पण करून आरती करून मंत्रपुष्प वाहणे व प्रार्थना करावी.

एकदंतं शूर्पकर्ण गजवक्त्रं चतुर्भुज ॥

पाशांकुशधरं देव ध्येयेत्सिद्धिविनायकं ॥

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ ।

निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा॥

सर्वांनी देवास गंध, फूल, दूर्वा वाहून साष्टांग नमस्कार घालावा. सर्वांना तीर्थप्रसाद द्यावा.

अजून वाचा – Ganesh Chaturthi 2021 | गणेशोत्सव