Suvichar in Marathi Part – 01 | सुंदर सुविचार मराठी – Marathi Dnyankosh, Marathi Suvichar – सुंदर मराठी सुविचार संग्रह – (Suvichar in Marathi, Best Marathi Quotes and Suvichar)
इतिहास सांगतो की, काल सुख होतं!
विज्ञान सांगतं की, उद्या सुख असेल!
पण माणुसकी सांगते की…
जर मन खरं असेल आणि
हृदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे..!
🌺🙏🌻शुभ सकाळ 🌻🙏🌺
🍃🍁तुमचा दिवस आनंदात जावो 🍁 🍃
” जीवन आहे
तेथे आठवण आहे.”
“आठवण आहे
तेथे भावना आहे.”
“भावना आहे
तेथे मैत्री आहे.”
आणि मैत्री आहे
तेथे नक्कीच,तुम्ही आहात..
“आदर हा आपल्या व्यक्तिमत्वातील महत्वाचा घटक आहे,
तो गुंतवणूकी सारखा आहे.
जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा त्याची परतफेड दुप्पटीने होत असते.”
या धावत्या जगात चार….
गोष्टी कधीही बदलू शकतात…!
☘विचार,निर्णय☘
☘माणूस आणि प्रेम☘
स्वप्न खूप मोठी असावीत…
पण जग दाखवणाऱ्या
आई वडीलांपेक्षा नाही…
कापुर आणि उदबत्ती यांच्या जळण्यात मोठा फरक आहे.
कापुर क्षणात खुप उजेड देतो पण त्याचे अस्तित्व मात्र क्षणभरच टिकते.
उदबत्ती उजेड देत नाही, मंद जळत राहते पण स्वत:च्या सुगंधाने सारा परिसर व्यापुन टाकते.
म्हणुन कापरासारखे क्षणभर उजळण्यापेक्षा उदबत्तीसारखे जगणे केव्हाही चांगले.
” जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं , उदबत्ती आमुलाग्र बदल घडवू शकते”..
दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही…..
🍂🍃🍁🍂🍃🍁🍂🍃🍁
।। ” खुप सुंदर वेळेची व्याख्या “।।
” वेळ ” फार हळू येते जेव्हा आपण तीची उत्कंठेने वाट पहात असतो.।।
” वेळ ” खुप लवकर निघुन जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो.।।
” वेळ ” अगदीच कमी असतो जेव्हा आपण खुप आनंदी असतो.।।
” वेळ ” जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात.।।
प्रत्येक वेळी ” वेळ ” आपल्या सोई प्रमाणे येत नाही,
म्हणून वेळोवेळी आनंदी रहा.।।
🌹💐 💐🌹
“इच्छेतून हक्कात आणि
हक्कातून शब्दात जी उमटते
ती खात्री….!!!!”
“स्मृतीतून कृतीत आणि
कृतीतून समाधानात जी दिसते
ती जाणीव….!!!!”
” मनातून *ओठावर आणि
ओठावरून पुन्हा मनात जाते
ती आठवण…!!!!”
‘म्हणुनच शुभ दिवसासाठी आपली आठवण !!!💐💐
”गुरुपौर्णिमा”
ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा,
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा..
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो..
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
🌹 🌹
Suvichar in Marathi Part – 01 | सुंदर सुविचार मराठी – Marathi Dnyankosh
!! गाव तो गावच असतो !!
पुणे,मुंबईत कितीही करा पैशाची साठवण,
संकटे आली की येते गावाची आठवण.
शाळा सोडली की लगेच निघतो शहरात कामाला,
सण, उत्सव साजरा करायची खरी मजा गावाला.
सकाळी उठलो की ट्रेन, बस साठी धावा,
आपल्या मनावर गावाला शेतावर कधी पण जावा.
गॅस संपला की वेळ येते राहायची उपाशी,
गावाला मात्र चुलीवर भाकरी टाकून खाऊ शकतो तिखट मिठाशी.
कधी येतात- जातात सण काही समजत नाही,
शिमगा, गणपती सणाला गावाला गेल्याशिवाय राहवत नाही.
असतील सर्व सुख-सोयी शहराकडे भावा,
पण गावच असे ठिकाण आहे जिथे मिळते शुद्ध हवा.
सगळीकडे रस्ते च रस्ते, बघायला नाही मिळत माती,
पहिल्या पावसात जो सुगन्ध दरवळतो तीच गावची माती.
कामावर सुट्टी मारली की, होतो पगार वजा,
भले शेतकरी कमी कमवतो पण तोच खरा राजा.
भाडं, शाळेची फी, इतर खर्च बघून वर्षभर माणूस नेहमी दुःखात,
उद्या काय होईल माहीत नाही, पण गावचा माणूस सुखात.
हॉटेल मध्ये जातो चायनीज, बर्गर खायला,
खरी मजा तर तिथे येते जेव्हा बसतो शेतावर जेवायला.
झोप लागत नाही इथे हफ्ते फेडून- फेडून माणूस थकतो,
चार पैसे कमी कमवतो पण सुखाने माणूस झोपतो.
दहा बाय दहा चा खोलीत पावसात पाणी भरतो,
गावच्या घराच्या पायरीला सुद्धा पाणी लागत नाही अंगणात च पाणी जिरतो.
कोणतीही वस्तू इथे फुकट मिळत नाही, पैसे मोजावे लागतात,
चिम्बोर्या, मासे, शेवला, आंबे, करवंदे ही गावलाच खायला मिळतात.
पैसा कमवतो, रिटायर झाला की गावचा रास्ता धरतो,
ज्या मातीत जन्माला आला, त्याच मातीत जातो.
आता स्मार्ट सिटी ओस पडल्या, 2-3 BHK वाटतो उदास,
मृत्यू समोर आला की गाव येतो कामास.
आपल्याला पाहून आजही आपलेपणा वाटेल गावाला,
आपला माणूस जगेल, म्हणून आनंद वाटेल गावाला.
गाव हा गावच असतो, गाव हा गावच असतो,
मणी, ध्यानी ,स्वप्नी सदैव गावच वसतो…🙏
अजून वाचा – सुंदर सुविचार मराठी
Leave a Reply